कपिल शर्माकडून सिद्धूची पाठराखण!

kapil-sharma
पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर वक्तव्य केल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंह सिद्धू हे पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा,’ अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून वादात सापडले आणि त्यांची ‘द कपिल शर्मा’ शोमधून हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी या शोमध्ये अर्चना पूरण सिंहची वर्णी लागली असल्याचे ट्विट सोनी टीव्हीने आपल्या अकाऊंटवर केले होते.

पण या शोमधून सिद्धूला खरोखरच बाहेर काढण्यात आले की केवळ काही एपिसोडसाठी अर्चनाला आणले गेले, हे सोनीने अद्यापही स्पष्ट केले नसल्यामुळे नेटकरी संतापले आहेत. याच्या परिणामस्वरुप ‘अनसब्सक्राईब सोनी टीव्ही’ही मोहिम ट्विटरवर जोरात सुरु आहे. अशात या संपूर्ण वादावर पहिल्यांदाच चुप्पी तोडत, नवज्योत यांना शोबाहेर काढलेले नाही, असे ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कपिल शर्मा याने स्पष्ट केले आहे.

कपिल एका चॅनलशी बोलताना सिद्धूची अप्रत्यक्षपपणे पाठराखण करताना दिसला. आपल्या राजकीय कामात नवज्योत सिंह सिद्धू बिझी असल्यामुळे अर्चना पूरण सिंह हिला त्यांच्या जागी घेण्यात आले. तशीही ही फार मोठी गोष्ट नाही. काही लोक सोशल मीडियावर प्रोपोगंडा करत आहेत. पण नवज्योत सिंग सिद्धूला शो बाहेर करणे, हा काही उपाय नाही. भारत- पाकिस्तान यांच्यात जो वाद सुरु आहे, त्यावर स्थायी तोडगा काढला जायला हवा, असे कपिलने म्हटले.

दरम्यान कपिल शर्मा हा सुद्धा नवज्योत सिंग सिद्धची अशाप्रकारे पाठराखण केल्यामुळे नेटक-यांच्या निशाणावर आला आहे. कपिलला नेटक-यांनी धारेवर धरले असून ‘बायकॉट कपिल शर्मा शो आणि कपिल-सिद्धू को हटाओ’ सारखे हॅशटॅग ट्रेंड करू लागले आहेत.

Leave a Comment