तुम्ही पाहिला आहे का सौदीच्या राजकुमाराचा 21 लाख कोटींचा महाल

saudi-palace
सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी 2015 साली पॅरिसमधील 57 एकरावर असलेला बंगला 300 मिलियन डॉलरमध्ये (21 लाख कोटी) खरेदी केल्यानंतर त्याची जगभर चर्चा झाली. त्या राजमहालातील कलर, झुंबर, पेटिंग्स अशा एक ना अनेक गोष्टी पाहिल्यानंतर आपण स्वप्नवत तर नाही ना याची जाणीव होते.
saudi-palace1
या राजमहालाची जगातील सर्वात सुंदर इमारतींमध्ये गणना केली जाते. पॅरिसमधील या राजमहालाल राजकुमार कधीतरी भेट देतो. पण दरमहा करोडो रुपयांचा खर्च या राजमहालाच्या देखभालीसाठी होतो.
saudi-palace2
त्याचबरोबर सौदीच्या या राजकुमाराने एक महागडी याट देखील खरेदी केली असून ती याट पाहिल्यानंतर तिची भव्यता लक्षात येते. शिवाय, तिच्या प्रेमात प्रत्येक जण पडतो. ही याट पाहिल्यानंतर याटच्या किमतीचा अंदाज येतो. राजकुमार या याटवर केवळ खास आणि मर्जीतील लोकांसाठीच पार्टीचे आयोजन करतो. याटवरती स्वीमिंग पूल, हॅलिपॅड आणि सर्व सोयी – सुविधा देखील आहेत.
saudi-palace3
सौदीच्या या राजकुमाराने दोन वर्षापूर्वी मालदीव येथे जंगी पार्टीचे आयोजन केले होते. हॉलिवुडचे सेलिब्रेटी देखील त्यावेळी हजर होते. मजा – मस्ती असा सारा माहोल आठवडाभर होता. यासाठी सर्व अलिशान हॉटेल्स आणि व्हिला बुक करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 57 कोटी एवढा खर्च आला होता. सौदीच्या राजकुमाराने आपल्या अधिकाऱ्यांसाठी देखील अलिशान घरे बांधून घेतली आहेत. या सौदीच्या राजकुमाराच्या ताफ्यात देशातील सर्वात महागड्या गाड्या आहेत. सध्या सौदीच्या राजाकडे जवळपास 18 महागड्या गाड्या आहेत.
saudi-palace5
सौदीच्या राजकुमाराने अरब युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. या राजकुमाराने वयाच्या 30व्या वर्षी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पार सांभाळली. येमेन युद्धामुळे खूप मोठा अनुभव मिळाला. या राजकुमाराने महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स सारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिवाय, 500 बिलियन डॉलर किमतीची सिलिकॉन व्हॅली उभारण्याची घोषणा देखील या राजकुमाराने केली आहे. 3 बिलियन डॉलर कमाई असलेल्या या राजकुमाराची वार्षिक कमाई 400 मिलियन आहे.

Leave a Comment