
नवी दिल्ली – सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंह याने यावर्षी होणाऱ्या विश्चचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर टीम इंडियाने बहिष्कार टाकावा अशी प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा
सध्याच्या घडीला भारतीय संघ हा समतोल असून जागतिक क्रिकेटवर राज्य करत आहे. टीम इंडिया पाकिस्तानसोबत न खेळताही विश्वचषक जिंकू शकतो, असा विश्वास हरभजनने व्यक्त केला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने प्रत्येक पातळीवर पाकिस्तानशी असलेले संबंध तोडून टाकण्याची सुरुवात केली आहे. त्याधर्तीवर भज्जीचे हे मोठे वक्तव्य मानले जात आहे.
