ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात दाखल झाली 2.20 लाख पाऊंडची मॅक्लॅरेन

Chris-Eubank-Jr
ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. लंडन येथील O2 येथील अरेनात सुपर मिडलबेड कॅटेगरीत जेम्स डेगालेचा सामना करणार आहे. 2016 व 2017 मध्ये आयबीओ सुपर- मिडलवेट गटाचे जेतेपद नावावर करणाऱ्या ख्रिसला जेतेपदाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी डेगालेशी मुकाबला करावा लागणार आहे. रविवारी हा सामना होणार आहे. पण त्यापूर्वीच त्याने आपल्या गाड्यांच्या ताफ्यात मॅक्लॅरेनचा समावेश केला आहे.
Chris-Eubank-Jr1
जवळपास 2.20 लाख पाऊंडची ( 2,03,15,299.73 भारतीय किंमत) मॅक्लॅरेन 720S ही गाडी ख्रिसने खरेदी केली आहे. त्याने गतवर्षीच बेंटली ही कार खरेदी केली होती. ख्रिस मॅक्लॅरेन खरेदीबाबत म्हणाला, मी यावर्षी 30 वर्षांचा होईन आणि या कारचा मला मनसोक्त आनंद लुटायचा आहे. तुम्हाला आयुष्य एकदाच मिळते आणि मनसोक्तपणे ते जगायला हवे. मी वयाच्या पन्नाशीत मॅक्लॅरेन चालवताना किती विचित्र दिसेन आणि मला कोणी ओळखणार देखील नाही.
Chris-Eubank-Jr2
पूर्व ससेक्स येथे 18 सप्टेंबर 1989 साली ख्रिस एयुबँक आणि कॅरोन सुजॅन स्टीफन मार्टिन यांचा मुलगा ख्रिस ज्यु. याचा जन्म झाला. ख्रिस वयाच्या 16 व्या वर्षी भावासह अमेरिकेत स्थायिक झाला. त्याने 2007 मध्ये बॉक्सिंगला सुरुवात केल्यानंतर त्याने सहा हौशी लढती जिंकून नेव्हाडा राज्यातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला. हौशी बॉक्सिंग कारकिर्दीत त्याने 24 विजय मिळवले, तर केवळ 2 सामने गमावले.

Leave a Comment