एसबीआयने पुलवामा शहिदांचे कर्ज केले माफ

loansbi
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांनी घेतलेले कर्ज त्वरित माफ केल्याची घोषणा केली आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्यांपैकी २३ जवानांनी एसबीआयकडून कर्ज घेतले होते. ते माफ केले गेले आहे. शिवाय हे सर्व जवान डिफेन्स सॅलरी पॅकेजप्रमाणे ग्राहक होते त्यामुळे त्यांना ३० लाखाची विमा सुविधा होती. विम्याची रक्कम लगेच देण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे बँकेने जाहीर केले आहे.

बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईने शहीद जवानाच्या परिवारासाठी मदतीचा हात पुढे केला असून त्यांना दोन खोल्यांचे घर देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या परिवाराला राज्यात, शहरात अशी घरे दिली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार १२ हजार रिअल इस्टेट कंपन्या देशाच्या २३ राज्यात आणि २०३ शहरात क्रेडाईच्या सदस्य आहेत. तेथे अशी घरे शहिदांच्या परिवाराला दिली जाणार आहेत.

Leave a Comment