आयकर अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने घातला छापा

aykar
करचुकवेगिरी किंवा करचोरी करणाऱ्यावर आयकर विभागाकडून छापे घातले जाणे ही आपल्या देशातील सर्वसामान्य घटना आहे. अश्या प्रकारच्या बातम्या नित्य वाचनात येतात. मात्र मध्यप्रदेशात मंदसौर जिल्ह्यात अमृत रिफायनरीच्या कार्यालयांवर आणि मालकाच्या घरावर छापे घातले गेले त्याची चांगलीच चर्चा होत आहे. हे छापे कुणालाही संशय येऊ नये म्हणून आगळ्या पद्धतीने अगदी फिल्मी स्टाईलने घातले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार अमृत रिफायनरी मालक मनोहर गर्ग यांनी बर्याच मोठ्या प्रमाणावर करचोरी केल्याची खबर आयकर विभागाला मिळाली तेव्हा आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी असा सुमारे २५० जणांचा ताफा एकाचवेळी कार्यालय आणि घरावर छापे घालण्यासाठी गेला. तेव्हा सोबत बँडबाजा आणि वरातीच्या कार्स होत्या. या कार्सवर विकास आणि निशा नावाच्या होत्या. परिणामी वरात असावी असे समजून कुणीच त्याकडे फार लक्ष दिले नाही. गर्ग याच्या घरात या वरातीच्या गाड्या गेल्या आणि एका क्षणात आयकर अधिकरी बाहेर पडले आणि छापा टाकला गेला.

Leave a Comment