हे पण मोदीच, पण हाताळतात धोकादायक बॉम्ब

aasit
झारखंड राज्यातील पोलीस इन्स्पेक्टर असितकुमार मोदी गेली २५ वर्षे बॉम्ब निकामी करण्याचे मोठे आव्हान पेलत असून त्याच्या करियरमध्ये त्यांनी आत्तापर्यंत ८०० हून अधिक बॉम्ब निकामी केले आहेत. त्यातील काही ४० किलो वजनाचे होते. या बॉम्बचा स्फोट झाला असता तर मोठे नुकसान होण्याची भीती होती. मोदीन मुख्यमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आला आहेच पण अन्य अनेक सन्मान त्यांनी मिळविले आहेत.

सध्या असितकुमार निवडणुका जवळ आल्याने खूपच व्यस्त असून त्यांच्यावर पोलिसांना बॉम्ब निकामी करण्याचे, बॉम्ब कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली गेली आहे. भूसुरुंग शोधणे. बाहेर काढणे, ते निकामी करणे हाही या प्रशिक्षणाचा एक भाग आहे.

bomb
असितकुमार सांगतात, ते मुळचे बिहारचे. वडील शिक्षक. त्यांनी कधी फटाके सुद्धा उडवू दिले नाहीत. त्यामुळे पोलीस दलात भारती झाल्यावर प्रथमच त्यांनी बंदूक आणि बॉम्ब पहिले. ते १९९४ च्या बॅचचे सबइन्स्पेक्टर. त्यांनी बॉम्ब निकामी करण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. असितकुमार सांगतात, बॉम्ब सापडला आणि निकामी करायची वेळ आली कि हे काम यशस्वी होणारच असे मी मनाला बजावतो. कारण भयाच्या पुढे विजयचा असतो. त्यांनी पहिला बॉम्ब निकामी केला तो पोलीस ठाण्यातच होता.

असितकुमार यांच्या पत्नी सांगतात, खूपच काम असल्याने ते कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. पण आम्हाला त्यांचा अभिमान आहे. ते कामगिरीवर गेलेले असले कि जीव घाबरतो, झोप उडते पण आम्ही देव आहे आणि तो त्यांचे रक्षण करेल आणि ते त्यांच्या कामात नक्कीच यशस्वी होतील यावर विश्वास ठेवतो आणि त्यांची वाट पाहत राहतो.

Leave a Comment