सायबेरियात काळ्या बर्फाची चादर

barf
कुठेही बर्फवर्षाव होत असेल तर पांढरेशुभ्र बर्फ पाहणे आणि पाहता पाहता या कापसासारख्या बर्फाने घरे, डोंगर, रस्ते पांढरे होऊन जाणे हा अनेकदा आनंदाचा सोहळा असतो. हाच बर्फवर्षाव अधिक तीव्र होत असेल तर थोडे चिंतेचे कारण असते. पण रशियाजवळ दक्षिण पश्चिम सायबेरियाच्या केमेरोवो भागातील तीन शहरे काळ्या बर्फाच्या थरांनी व्यापली गेली असून त्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या शहराची लोकसंख्या २६ लाख आहे.

barf1,
किस्लोकोव्ह, प्रोकोपाईव्हस्क आणि लेनिन्स्ककुज्नेत्स्की या शहरांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी असून त्यातून प्रचंड प्रमाणावर कोळसा खणला जातो. परिणामी येथील हवेत नेहमीच कोळशाच्या कणांचे प्रमाण खूप असते. मैलोनमैल अशी कोळश्याची धूळ हवेत असते. यामुळे येथील नागरिकांना नेहमीच श्वसनाचे रोग होतात तसेच येथे कॅन्सर टीबीचे प्रमाणही अधिक आहे. हीच कोळसे धुळ आता पडत असलेल्या बर्फावर साचत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या तसेच वृद्ध लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या धुळीत अर्सेनिक सारख्या धोकादायक धातूंचे प्रमाण खूप आहे यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

Leave a Comment