उदयनराजेंच्या फोटोनी सजविली बस

udayn
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातारा गादीचे वारसदार उदयनराजे यांचे अनेक चाहते आहेत आणि राजांसाठी ते काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. उदयनराजे खासदार आहेत आणि राजकारणात बिनधास्त आणि स्पष्ट विधाने करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. या न त्या कारणाने राजे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राजे चर्चेत आले आहेत ते एका समर्थकाच्या प्रेमामुळे.

पुसेगाव येथील राजांचे समर्थक अक्षय जाधव यांनी त्यांच्या शिवराज ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस वर उदयनराजे यांच्या छबी रंगविल्या आहेत. स्टाईल इज स्टाईल अशी अक्षरेही रंगविली आहेत. अशी सजविलेली बस जाधव यांनी राजांना दाखविण्यासाठी त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी आणली तेव्हा ती पाहून राजे ख़ुशी लपवू शकले नाहीत. त्यांनी बस समोर उभे राहून फोटो काढून घेतला. राजे खुश झाले हे पाहून जाधव यांनाही त्याच्या श्रमाचे फळ मिळाले असे वाटले.

Leave a Comment