येथे चक्क रोबो जुळवतात लग्न

robot
लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. त्यासाठी इच्छुक वधु-वरांचे पालक जन्मपत्रिका घेऊन ज्योतिषी किंवा ब्राम्हणांकडे पोहचतात आणि मग सुरु होतो पत्रिका जुळवण्याचा ससेमिरा. पण जगाच्या पाठीवर एक असा ही देश आहे जिथे या संकल्पना कालबाह्य झाले आहेत. कारण तेथे लग्न चक्क रोबो जुळवतात.
robot1
नियोजित वधु वरांचा एक मेळावा नुकताच जपानची राजधानी टोकियोमध्ये आयोजित करण्यात आला होता. नियोजित वधु-वरांसह ज्यात रोबोंचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे यावेळी हे रोबो एका पोस्टमनचे काम करत होते. हा वधु-वर मेळावा टोकियो येथील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यात काम करणारी कंपनी कन्टेट इनोवेशन प्रोग्राम असोसिएशनने आयोजित केला होता.
robot2
मुला-मुलींशी संबंधित इच्छा, आवडी आणि नोकरी यासारखी माहिती या रोबोट्समध्ये फिड करण्यात आली होती आणि या कार्यक्रमात त्याच आधारावर सहभाग घेणाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका तरूणीने सांगितले की, रोबोटच्या मदतीने मला हवा होता तसाच जोडीदार मिळाला. अशाप्रकारचे कार्यक्रम जपानमध्ये नेहमी होत असतात. ज्यात लोक स्वत:साठी पार्टनर शोधतात. ‘कोनकात्सु’ असे याला जपानी भाषेत म्हटले जाते.

Leave a Comment