भारतीय रुपयाच्या तुलनेत कवडीमोल पाकिस्तानी चलन

currancy
आपल्या देशावर वारंवार दहशतवादी हल्ले घडवून आपल्या देशाची अर्थव्यवस्था बिघडवण्याचे मनसुबे मनाशी धारणारा पाकिस्तास स्वतःच आर्थिक कोंडीतून जात आहे. दरम्यान पाकिस्तानी चलनाची भारतीय चलनाशी तुलना केल्यास भारताच्या 1 रुपयासमोर पाकिस्तानाच्या एक रुपयाची किंमत निम्मी म्हणजेच फक्त 51 पैसे एवढी होते. त्याचबरोबर अमेरिकन डॉलरशी तुलना केल्यास एका अमेरिकन डॉलरच्या बदल्यात 138.85 पाकिस्तानी रुपये येतील.

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) घेतलेल्या कर्जाचा डोंगर एवढा वाढला आहे कि त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चीन आणि अन्य देशांकडे भीक मागावी लागत आहे. त्यातच पाकिस्तानची भारताने आर्थिक कोंडी करण्याचा निर्णय घेतल्यावर पाकिस्तानाला नक्कीच भीकेचे डोहाळे लागण्याची वेळ आली आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून पाकिस्तान परकीय चलनाच्या संकटाला सामोरे जात असून पाकिस्तानी रुपयाने 2 डिसेंबर 2018 रोजी निच्चांक गाठला. इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदी निवडून आल्यानंतर अवघ्या 100 दिवसांतच त्यांच्या देशाची ही अवस्था झाली.

Leave a Comment