विश्चचषकानंतर थंडवणार ख्रिस गेल नावाचे वादळ

chris-gyale
२०१९ च्या विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वेस्ट इंडिजचा धकाड फलंदाज अशी ओळख असलेल्या ख्रिस गेलने जाहीर केले आहे. इंग्लंड विरोधातील वेस्ट इंडिजची एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार असून ख्रिस गेलने ही घोषणा या पार्श्वभूमीवर केली. त्याचबरोबर ख्रिस गेल निवृत्त होणार असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेटनेही ट्विटरवरून म्हटले आहे.


आत्तापर्यंत २८४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने ३९ वर्षीय ख्रिस गेलने खेळले आहेत. ३७.१२ च्या सरासरीने त्याने ९ हजारांच्या वर धावा केल्या आहेत. त्यात २३ शतके आणि ४९ अर्धशतकांचा समावेश आहे. ख्रिस गेल हा कसोटीत त्रिशतक, एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात शतक झळकवणारा जागतिक क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे.

Leave a Comment