रजनीकांत यांच्या निर्णयानंतर कमल हसन यांचा टोला

kamal-hasan
चेन्नई : अभिनय विश्वातून राजकारणाकडे आपला मोर्चा वळवणारे सुपरस्टार अभिनेते रजनीकांत काल दिवसभर आपल्या निर्णयामुळे चर्चेत होते. त्यांनी वर्षभरापूर्वीच आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना असे वाटत होते की यावेळे थलैवा निवडणूक लढवणारच. पण त्यांनी काल जाहिर केलेल्या निर्णयामुळे अनेकांची घोर निराशा झाली. त्यांच्या या निर्णयानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुदुच्चेरी एका कार्यक्रमात आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याविषयीची माहिती देत असताना कमल हसन यांनी आपण निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केल्यानंतर त्यातुन माघार घेण्याच्या निर्णयामुळे तुमचा हशा तर होणार असा टोला त्यांनी रजनीकांत यांना लगावला. आपण राजकारणात प्रवेश करत असून तुमच्याकडून निवडणूक लढवली जाईल असे अपेक्षित आहे. त्यात तुम्ही जर आम्ही पुढील निवडणूक लढवू असे म्हटले तर तुमचा आदर जनता करणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात तूर्तास आपला पक्ष न उतरवण्याचा निर्णय घेत आपण सध्यातरी तामिळनाडूतील विधानसभा निवडणूकांवरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर इतर कोणत्याही राजकीय पक्षाला आपण पाठिंबा देणार नसल्याचे म्हणत पक्ष कार्यकर्त्यांना पक्षाच्या नावाचा आणि चिन्हचा कोणताही गैरवापर करु नये असा सल्ला देखील दिला.

Leave a Comment