‘या’ अभिनेत्रीशी जुळले आहे अभिनय बेर्डेचे सूत!

abhinay-berde
सचिन पिळगांवकर यांच्या अशी ही अशिकी या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय बेर्डे आणि नवोदित अभिनेत्री हेमल इंगळे ही जोडी पहिल्यांदाच आपल्यासमोर आहे. या दोघांच्या बाबतीत असे म्हटले जात आहे की या दोघांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री आता ऑफ स्क्रिन देखील पाहायल मिळत आहे. त्यामुळेच त्यांच्याबाबत हे आता लव्ह बर्ड्स झाले आहेत का अशी चर्चा जोर धरत आहे. कारण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांची केमेस्ट्री अशी जुळून आली आहे की असे वाटत आहे या दोघांनी याआधी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे.

त्याचबरोबर प्रमोशन दरम्यानचे त्यांचे फोटोज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट तर करत नाही ना अशीच चर्चा सोशल मीडियावर जोर धरत आहे. पण या दोघांनी या विषयावर चिडीचुप्प साधली असल्यामुळे आगामी काळातच या दोघांमध्ये अशी ही आशिकी आहे का? हे कळेल. दरम्यान या दोघांचा आगामी अशी ही आशिकी हा चित्रपट येत्या 1 मार्चला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment