या गावाचे सेनेशी ३०० वर्षांचे नाते

sena
देशसेवा हे अनेकांचे ध्येय असते यामुळेच देशाच्या काना कोपऱ्यातील लहान मोठ्या गावातून अनेक जवान भारतीय लष्करात भरती होत असतात. जीवावर उदार होऊन हे जवान मातृभूमीसाठी शेवटचा श्वास घेईपर्यंत लढत राहतात. यात कोणताही धर्म, समुदाय अथवा जातपात याचा विचारही केला जात नाही. आंध्रप्रदेशातील माधवरम नावाचे एक चिमुकले गाव सेनेशी गेली ३०० वर्षे नाते जुळवून आहे. याची फारशी माहिती लोकांना नाही.

sena1
या गावाला सैन्याचा वारसा आहे. गोदावरी जिल्यातील या गावातील प्रत्येक घराचा सैन्याशी या ना त्या प्रकारे संबंध आहे. या गावातील सैनिकांना सुभेदार, कॅप्टन, मेजर अश्या त्याच्या हुद्द्यावरूनच बोलावले जातेच पण मुलांची नावेही तशीच ठेवली जातात. येथील प्रत्येक घराची कहाणी अलग आहे आणि ती मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. एका रिपोर्ट नुसार १७ व्या शतकात गजपती राजवंशाचा राजा माधववर्मा याने हे गाव सैनिकांचे ठाणे म्हणूनच वसविले होते.

sena2
परिमाणी अनेक सैनिक येथे वस्तीला आले. या गावात खिळ्यापासून शस्त्रांपर्यंत सर्व साठा केला जात असे. पहिल्या जागतिक युद्धात येथील ९० सैनिक सामील होते तर दुसऱ्या महायुद्धात ही संख्या १ हजारवर गेली होती. या गावात सैनिक स्मारक आहे. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी या गावाची माहिती मिळाली तेव्हा तेथे मिलिटरी ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आता येथे डिफेन्स अॅकेडमी स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment