ई कार खरेदीवर सरकार देणार ५० हजाराची मदत

electrikkar
हवेचे प्रदूषण कमी व्हावे आणि पेट्रोल डीझेल वरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून ई वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे. ग्राहकांनी ई कार खरेदी करावी यासाठी सरकार खरेदीवर ५० हजार रुपयांची सूट देणार असून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

अन्य नेहमीच्या वाहनांच्या तुलनेत ई वाहने महाग आहेत. त्यामुळे देशात ई कार्सना म्हणावी तशी मागणी नाही. ई वाहनांच्या किमती अन्य वाहनाइतक्या व्हाव्या यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. पण ग्राहकांना या कार खरेदीसाठी उद्युक्त करण्यासाठी सवलती देत आहे. इलेक्ट्रिक कार वापर वाढल्यास पेट्रोल डीझेल चा खप कमी होणार असून त्यामुळे कार मालकांचे पैसे वाचणार आहेत. हवा प्रदूषणाची पातळी कमी होणार आहे शिवाय इंधन भरण्यासाठी पंपावर जाणारा वेळ वाचणार आहे. कारण इलेक्ट्रिक कार घराच्या घरी चार्ज करता येणार आहेत. अर्थात या पारंपारिक कार्सचे उत्पादन बंद केलीए जाणार नाही तर त्यांची संख्या कमी केली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे.

Leave a Comment