झारखंड मध्ये सोन्याचे नवे साठे आढळले

gold
नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिजाचे भांडार असलेल्या झारखंड राज्यात सोन्याचे नवे सात साठे सापडले असून त्यामुळे या राज्यातील सोने साठ्यांची संख्या आता १७ वर गेली आहे. यापूर्वी जमशेदपूर आणि रांची परिसरात सोने साठे आढळले होते आता सिंहभूम भागातील भेनगड, फुलसादी तेम्बो सह आसपासच्या भागात हे साठे सापडले आहेत. भूगर्भ विभागाने या माहितीला दुजोरा दिला आहे.

या ठिकाणी किती सोने असू शकेल याचा अंदाज घेणाऱ्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या राज्यात यापूर्वी कोळसा, अभ्रक खनिजांचे साठेही विपुल प्रमाणात सापडले आहेत. सोने भांडारात किती सोने असेल याचा अंदाज घेऊन त्याचे मॅपिंग केले जाणार आहे आणि त्यानंतर या साठ्यांना खाणीचा दर्जा दिला जाणार आहे असे समजते. या खाणी सुरु झाल्या तर राज्याचा महसुलात प्रचंड वाढ होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment