एनडीटीव्हीच्या महिला पत्रकाराची पुलवामा हल्ल्याबाबत वादग्रस्त पोस्ट

NDTV
गुरुवारी जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अवघा देश निषेध व्यक्त करत असतानाच एनडीटीव्हीच्या एका महिला पत्रकाराने सोशल मीडियावर आपला अतिशहाणपणा दाखवत एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. शहीद जवानांची खिल्ली उडवणारी एक पोस्ट या पत्रकाराने आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केली. याची माहिती एनडीटीव्हीला कळताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत त्या महिला पत्रकाराचे दोन आठवड्यासाठी निलंबन केले आहे.


आपल्या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटवरून एनडीटीव्हीच्या वरिष्ठ महिला संपादक निधी सेठी यांनी शहीद जवानांची खिल्ली उडवली असून सेठी यांनी ’56 इंचाच्या तुलनेत 44 भारी पडले’ अशा आशयाचे ट्विट करत #HowsTheJaish असा हॅशटॅगही वापरला. #HowsTheJaish या हॅशटॅगकडे दहशतवाद्यांना पाठिंबा दर्शविणारा हॅशटॅग म्हणून पाहिले जाते.

अवघ्या काही मिनिटातच वाऱ्याच्या वेगाने त्यांची ती पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आणि संबंधित महिला पत्रकार नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडली. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टचा चांगलाच समाचार घेत झापले आहे.

Leave a Comment