आता शांततेबद्दल बोलणाऱ्यांची गाढवावरुन धिंड काढली पाहिजे – कंगना राणावत

kangana-ranawat
गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशातील जनतेपासून क्रीडा क्षेत्र ते बॉलिवूडपर्यंत सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत. त्यात आता बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावतने या हल्ल्याबाबत कठोर शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना कंगना म्हणाली की यापुढे पाकिस्तानाशी समजुतीने घ्या असे कोणी बोलेल तर भररस्त्यात त्याचा कान लाल करा.

पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी हिंसा नव्हे तर संवाद हवा, असा पुळका आणत पंजाब सरकारचे आरोग्यमंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी वक्तव्य केले होते. त्याचा देखील कंगनाने नाव न घेता समाचार घेतला आहे. आपले जवान येथे एका मागोमाग शहीद होत आहेत आणि काहीजण पाकिस्तानचा पुळका घेत दया, क्षमा आणि शांतीच्या गप्पा मारत आहेत. अशांची गाढवावर बसून शहरात धींडच काढली पाहिजे.

हे कृत्य करुन पाकिस्तानने आपल्याला थेट आव्हान देत आपल्या आत्मसन्मानाचा आणि आपण शांत बसत असल्याचा फायदा घेतला आहे. अशा परिस्थितीत त्यांना अद्दल घडवण्यासाठी निर्णायक पावले उचलणे आवश्यक असल्याचे कंगना पुढे म्हणाली. याच दरम्यान कंगनाला जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या बाबत विचारले असता, त्यांना कंगनाने देशद्रोही संबोधले. ती पुढे म्हणाली की पाकिस्तानशी हे दोघे संस्कृतीचे अदान-प्रदान करतात. भारत तेरे तुकडे होंगे म्हणाऱ्यांचे हेच लोक समर्थन करतात. एवढे सगळे घटनाक्रम देशाच्या सीमेवर घडत असताना या लोकांना पाकिस्तानात कार्यक्रम घेण्याचे सुचतेच तरी कसे? असा प्रश्न यावेळी कंगनाने उपस्थित केला.

Leave a Comment