पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा पहिल्याच प्रवासात पचका

vande-bharat
नवी दिल्ली : चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अवघ्या 18 महिन्यात निर्माण केलेल्या ‘ट्रेन 18’ नाव असलेल्या ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुक्रवारी या ट्रेनचे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ हे नामकरण करुन हिरंवा झेंडा दाखवण्यात आला होता.

पण पहिल्या सेमा हायस्पीड ट्रेनचा पहिल्याच प्रवासात पचका झाला असून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला आज सकाळी म्हशीने धडक दिल्याने ट्रेन काही वेळ थाबंवण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा प्रकार ट्रेन वाराणसीहून दिल्लीला परतत असताना घडला. ही ट्रेन उत्तरप्रदेशच्या टुंडला स्टेशनपासून 18 किमीवर थांबवण्यात आली. ट्रेन सकाळी 5.30 वाजता थांबली होती, त्यानंतर जवळपास 8.15 वाजता ही ट्रेन पुन्हा दिल्लीला रवाना झाली.

प्रतितास 160-200 किमी/तास वेगाने ही ट्रेन धावू शकते. शताब्दी ट्रेनसारख्या अत्याधुनिक सुविधा या ट्रेनमध्ये देण्यात आल्या असून या ट्रेनचे आरक्षणही सुरु झाले आहे. ही ट्रेन 17 फेब्रुवारीपासून दिल्ली ते वाराणसी या मार्गावर आठवड्यातून पाच दिवस ही ट्रेन चालवण्यात येणार आहे.

16 वातानुकूलित डबे या ट्रेनला असणार आहेत, ज्यामध्ये दोन डबे एक्झिक्युटिव्ह श्रेणीचे असणार आहेत. या ट्रेनमध्ये एकूण 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे. ट्रेनचे दरवाचे स्वयंचलित आहेत. प्रवाशांच्या ट्रेनमध्ये हॉटस्पॉटची सुविधाही देण्यात आली आहे. जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती रेल्वेला मिळू शकेल. दोन प्रकारची प्रकाश सुविधा डब्यांमध्ये देण्यात आली आहे, एक सर्वांसाठी सामान्य प्रकाश सुविधा आणि दुसरी प्रत्येक सीटवर वेगवेगळी प्रकाश व्यवस्था देण्यात आली आहे. रेल्वेत झिरो डिस्सार्ज बायो व्हॅक्युम शौचालये आहेत.

Leave a Comment