आपल्या तृतीयपंथीय प्रेमिकेशी व्हॅलेंटाईन डेला बांधली त्याने लग्नगाठ

transgender
सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षात देशात समलैंगिकता गुन्हा नसल्याचा निर्णय दिल्यानंतर एलजीबीटी समूहाला दिलासा मिळाला होता. त्यानुसार मध्यप्रेदशामधील इंदौरमध्ये व्हेलेंटाईन डेच्या दिवशी एक अनोख विवाह सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून जुनैद खान याचे जया सिंह परमार नावाच्या तृतीयपंथीय व्यक्तीवर प्रेम होते. अर्थातच या प्रेमाला जुनैदच्या घरच्यांचा टोकाचा विरोध होता. पण या विरोधाला न जुमानता जुनैदने जयाला 15 दिवसांपूर्वी प्रपोज केले.
transgender1
जुनैदने जयाशी 14 फेब्रुवारी या व्हेलेंटाईन डेला हिंदू पद्धतीने विवाह केला. हे जोडपे लवकरच मुस्लीम धर्माप्रमाणे सुद्धा निकाह करणार आहेत. आमच्या नात्याचा स्वीकार माझ्या कुटुंबाने करावा, हीच एकमेव इच्छा असल्याचे जुनैदने म्हटले आहे. जर आमच्या कुटुंबियांनी स्वीकारले नाही, तर मी तिच्यासोबत आयुष्यभर आनंदाने राहणार असल्याचे त्याने म्हटेल आहे. आपल्या देशात तृतीयपंथीयाशी केले लग्न ग्राह्य धरले जात नाही. आता आमचे नाते जुनैदच्या कुटुंबियांनी स्वीकारवे हिच इच्छा असल्याचे म्हणत सासरच्यांची मला सेवा करता येईल, असे जया म्हणाली.

Leave a Comment