प्रेमभंग झालेल्यांना चहापानाच्या बिलामध्ये विशेष सवलत देतो हा ‘बेवफा चायवाला’

chaiwala
देवदास या चित्रपटाचे नाव घेतल्यानंतर आपल्या समोर उभा राहतो, तो प्रेमभंग झालेला तरुण. या चित्रपटात देवदास हा प्रेमभंग झाल्यानंतर कुठल्या अवस्थेत जातो हे आपल्याला माहितच आहे. त्यातच आता नुकताच व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. या दरम्यान कित्येकांची हृदय जुळली असतील किंवा त्यांचा प्रेमभंग झाला असेल. ज्यांचे प्रेम जुळून आले ते सध्या डुएट गाणी असतील तर प्रेमभंग झालेले दर्दभरे नगमे ऐकत असतील.
chaiwala1
पण आम्ही आज तुम्हाला एका अशा व्यक्तिची गोष्ट सांगणार आहोत ज्याने आपल्या प्रेयसीच्या आठवणीत चक्क एक चहाचे दुकानच थाटले आहे. प्रेमभंग झालेल्या तरुणांमध्ये हे चहाचे दुकान आकर्षणाचे तसेच चर्चेचे ठिकाण बनले आहे. हा चहावाला प्रेमभंग झालेल्या तरुणांना त्यांच्या चहापानाच्या बिलात चक्क विशेष सुट देत आहे.
chaiwala2
या चहावाल्याचे नाव आदित्य सिंह असे असून त्याचे बेवफा चायवाला असे दुकान लखनौमधील फन मॉलजवळ आहे. त्याच्या दुकानात चहासोबतच धोका, बेवफाई, बेईमान, बदनाम असे विश्लेषण असलेले पदार्थ मिळतात. आदित्यच्या प्रेयसीला मॅगी, माइक्रोनी आणि कॉफी असे पदार्थ आवडत होते त्यामुळे त्याने आपल्या दुकानातील मॅगीला बकवास, माइक्रोनीला बेईमान आणि कॉफी बदनाम अशी नावे दिली आहेत.
chaiwala3
दुकान खोलण्यामागाचा उद्देश सांगताना आदित्य सांगतो की, माझा प्रेमभंग झाल्यानंतर मी चहाचे दुकान काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बेवफा चायवाला असे नाव ठेवण्याचे मी ठरवले. या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रेमी युगलांना 15 रुपयात तर प्रेमभंग झालेल्यांना सवलतीच्या दरात म्हणजेच 10 रुपयात चहा दिला जातो. म्हणूनच प्रेमभंग झालेले अनेक तरुण त्याचा सवलतीच्या दरातील चहा पिण्यासाठी येथे भेट देतात.

Leave a Comment