ब्रह्मांडातील पॉवरफुल फोन शाओमी मी ९ एक्सप्लोरर

explorer
चीनी कंपनी शाओमी येत्या २० फेब्रुवारीला फ्लॅगशिप फोन मी ९ लाँच करात आहे. लिक झालेल्या रिपोर्टनुसार याच फोन बरोबर शाओमी मी ९ एक्सप्लोरर एडिशन सादर करेल असे सांगितले जात आहे. चीनी वेबसाईट वायबोवर या फोनचे चार रिअर कॅमेरे दाखविले गेले आहेत. कंपनीने या फोनबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र कंपनीचे सहसंस्थापक वँग चुआन यांनी शुक्रवारी त्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.

वँग चुआन यांनी गेले काही दिवस ते हा फोन वापरत असून हा केवळ जगातला नाही तर ब्रह्मांडातील सर्वाधिक पॉवरफुल फोन आहे असे म्हटले आहे. मी ९ एक्सप्लोरर हँडसेट मध्ये अॅडीशनल कॅमेरा असेल आणि या फोनच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज असेल असेही त्यांनी सूचित केले आहे. गतवर्षी मी ८ एक्सप्लोरर रिअर ट्रान्स्परंट बॅकसह सादर केला गेला होता. या फोनमध्येही हे फिचर असेल आणि तो १० जीबी रॅम सह आणि जादा स्क्रीन स्पेससह येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment