गाईंसाठी आले डेटिंग अॅप – टुडर

tudder1
डेटिंग अॅप टींडर आपल्या परिचयाचे झाले आहे. आता अश्याच धर्तीचे एक अॅप गाईंसाठी आले असून ब्रिटन मधील शेतकरी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागले आहेत. टूडर असे या अॅपचे नाव आहे. टींडर मध्ये ज्याप्रमाणे पसंत पडलेल्या जोडीदारासाठी राईट स्वाईप करावे लागते तसेच टूडर मध्ये गाईसाठी जो बैल पसंत असेल त्याला राईट स्वाईप करावे लागते.

tudder
अर्थात हे काम गाईचे मालक करतात आणि नंतर गाय आणि बैलाचे मिलन घडवून आणले जाते. शेतकरी या अॅपवर आपल्या गाईसाठी योग्य बैलाचा शोध घेऊ शकतात. या अॅप वर गाईचे फोटो आणि माहिती अपलोड केली जाते. ती शेअर केली जाते. दुसरीकडून बैलाची माहिती असतेच. गाईची माहिती देताना तिने किती वासरांना जन्म दिला आहे त्याचा उल्लेख करावा लागतो. शेतकऱ्यांसाठी हे अॅप अतिशय उपयुक्त ठरते आहे.

ब्रिटन मध्येही गाई गाभण करताना अनेक अडचणी येतात. बैल चांगला नसेल तर गाईच्या दुधावर परिणाम होतो. त्यामुळे ब्रीड शोधताना शेतकरी विशेष काळजी घेतात. अॅप वर बैलाची सर्व माहिती मिळत असल्याने कोणता बैल ब्रीड साठी निवडायचा हे शेतकरी ठरवू शकतात.

Leave a Comment