अल्बानिया- ५ लाख बंकर असलेला देश

bunker
जगातील अनेक देशात अत्याधुनिक बांधकामे होत आहेत. मात्र एखाद्या देशाने १४ वर्षे फक्त बंकर बांधण्यात अब्जावधी डॉलर्स खर्च केले आणि त्यापायी देशाला गरीब होण्याची वेळ आली हे खरे वाटणार नाही. मात्र अल्बेनिया या देशाने हे सारे भोगले असून या देशात १९७५ ते ८९ या काळात अंदाजे ५ लाख बंकर बांधले गेले. कारण होते अमेरिका आणि रशियातील शीतयुद्ध.

bunker1
अनेक दशके या देश कम्युनिस्ट शासनामुळे अन्य जगापासून अलग पडला होता आणि त्याकाळचा हुकुमशाह एनवर होक्सहा याने शत्रूची अशी भीती घेतली होती कि त्याने समुद्रकिनाऱ्यापासून पहाडी भागापर्यंत, शेते, हायवे अश्या सर्व ठिकाणी बंकर बांधले आणि त्यापायी देशाला गरिबी आली. दुसर्या महायुद्धात इटलीने या देशाचा पाच दिवसात पराभव केला त्याने दहशत पसरली होती..

bunder3
अर्थात अल्बिनियाने गनिमी काव्याच्या सहाय्याने त्यांचा लढा सुरु ठेवला होता. जर्मनी आणि इटली यांच्यावर दोस्त राष्ट्रे भारी पडू लागली तेव्हा अल्बानियाच्या बंडखोरांनाही बळ मिळाले. आणि नोव्हेंबर ९४ मध्ये या देश पूर्ण स्वतंत्र झाला.

आजही या देशात सर्वत्र हे बंकर आहेत. काही मोडले आहेत काही तुटले आहेत. काही बंकर रेस्टॉरंट, हॉटेल मध्ये बदलले गेले आहेत तर काही बंकर मध्ये घरे, स्विमिंग पूल, धान्याची कोठारे, पूल, पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आहेत. आता या बंकरचा वापर पर्यटन वाढीसाठी करता येईल काय याचा विचार सुरु आहे.

Leave a Comment