अँटी व्हेलेंटाइन डे बद्दल थोडेसे

anti-valentine
फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना मानला जातो. कारण या महिन्यात व्हेलेंटाइन डे आणि व्हेलेंटाइन विक साजरा केला जातो. तसा तो यंदाही ७ ते १४ फेब्रुवारी पर्यंत साजरा केला गेला. मात्र अनेकांना या व्हेलेंटाइन विक नंतर अँटी व्हेलेंटाइन डे आणि विक साजरा केला जातो याची माहिती नसेल. अँटी व्हेलेंटाइन डे १५ फेब्रुवारीला साजरा होतो तर १५ ते २१ फेब्रुवारी हा आठवडा अँटी व्हेलेंटाइन विक म्हणून साजरा होतो.

या विक मध्येही व्हेलेंटाइन विक प्रमाणे प्रत्येक वेगळा दिवस असतो आणि तो वेगवेगळ्या नावानी साजरा होतो. ज्यांना ब्रेकअप ला सामोरे जावे लागले आहे अथवा जे व्हेलेंटाइन डे दिवशी सिंगल होते, प्रेमात धोका खातात असे लोक हा विक साजरा करतात. व्हेलेंटाइन विक मुळे बोअर झालेल्यांसाठी ही चांगली संधी असते. अर्थात हा विक कुणी गंभीरपणे घेत नाही तर मस्ती मौजेसाठी तो साजरा केला जातो.

यात १५ फेब्रुवारी स्लॅप डे, १६ फेब्रुवारी किक डे, १७ ला परफ्युम डे, १८ ला फ्लर्ट डे, १९ ला कन्फेशन डे, २० ला मिसिंग डे आणि २१ फेब्रुवारीला ब्रेक अप डे साजरा केला जातो असे सांगितले जाते. खरे खोटे सेंट व्हेलेंटाइन जाणे.

Leave a Comment