कुरळे केस असे करा मॅनेज

sanya
सुंदर दाट केस सर्व वयोगटातील महिलांसाठी आकर्षण आहे. आपले केस चमकदार, आरोग्यपूर्ण दिसावेत यासाठी मुली अनेक प्रकारे त्यांची काळजी घेत असतात. काही मुलीचे केस कुरळे असतात. हे केस दिसतात सुंदर पण ते मॅनेज करणे तितकेसे सोपे नाही. आजकाल कुरळे केस ट्रेंडमध्ये असून अनेक बॉलीवूड तारका त्यांचे केस कुरळे करून घेताना दिसत आहेत. कतरिना कैफ, सान्या मल्होत्रा हि ताजी उदाहरणे.

कुरळे केस दिसायला छान, बाउन्सी आणि आकर्षक दिसतात. मात्र या केसांची काळजी अधिक घ्यावी लागते. त्यासाठी काही हेअर केअर टिप्स उपयुक्त ठरतात. कुरळे केस गुंतले तर तर हेअरब्रशचा वापर शक्यतो करू नये तर गुंता सोडविण्यासाठी मोठ्या दाताचा कांगावा वापरावा आणि गुंता सोडविण्यापूर्वी केस थोडेसे ओले करून घ्यावे.

kangna
असे केस विंचरताना कर्लिंग प्रोडक्ट्स वापरावेत. ओले केस वाळविण्यासाठी मऊ कॉटन टॉवेलचा वापर करावा आणि केस खसाखसा न पुसता हलक्या हाताने पुसावेत. फ्रीज फ्री ठेवण्यासाठी सौम्य शाम्पू वापरावा. त्यानंतर कंडीशनर अवश्य वापरावा. झोपताना उशीवर सॅटीनचा अभ्रा घालावा. त्यामुळे केस गुंतत नाहीत. शाम्पू करून केस वळविले कि स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर करावा.

Leave a Comment