या देशात स्कर्ट घातलेल्या मुलींचे आक्षेपार्ह छायाचित्र काढल्यास होईल शिक्षा

skirt
ब्रिटनमध्ये सध्या असे काहीतरी घडले आहे, ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. ब्रिटनमध्ये, स्कर्ट घातलेल्या एखाद्या मुलीचा किंवा महिलेचे फोटो काढणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. या कायद्याची मागणी स्कर्ट घालून फोटो काढल्याप्रकरणी बळी ठरलेल्या गिना मार्टिनने केली होती, त्यांनी सुमारे याबाबत 18 महिने मोहिम राबवली होती. सरकारने आता आक्षेपार्ह फोटो काढण्याला गुन्हेगारीच्या श्रेणीत टाकले आहे. 18 महिन्यांच्या मोहिमेनंतर ब्रिटनमध्ये स्कर्ट घातलेल्या एखाद्या मुलीचा किंवा महिलेचा तिच्या परवानगीविना तिचा आक्षेपार्ह फोटो काढल्यास तो एक गुन्हा ठरणार आहे.

आता अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांची शिक्षा होईल आणि त्याचे नाव देशाच्या लैंगिक गुन्हेगारांच्या यादीत जोडले जाईल. नवीन कायदेशीर तरतूद लागू करण्यापूर्वी, अशा छायाचित्रकारांविरुद्ध ‘सार्वजनिक निर्णयाविरूद्ध कारवाई करण्यासाठी’ कायदेशीर कारवाई करण्यात आली.

अशा कृत्यांसाठी आता स्पष्ट कायदेशीर तरतूद लागू केली गेली आहे. या गुन्हाशी संबंधित विधेयक गुरुवारी राणी एलिझाबेथ यांनी मंजूर केल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. या कायद्याच्या मागणीसाठी ‘अपस्कर्टिंग ‘ला (स्कर्टने घेतलेल्या महिलेचा अथवा तरुणीचा आक्षेपार्ह फोटो घेणे) ला बळी पडलेल्या गिन मार्टिनच्या नेतृत्वाखाली 18 महिन्यांपर्यंत हि मोहिम सुरु होती.

Leave a Comment