केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपकडे मागितली पॉर्नोग्राफी, हिंसक संदेश पाठविणाऱ्यांची माहिती

whatsapp
मोदी सरकार सध्याच्या घडीला व्हॉट्सअ‍ॅपवर हिसंक संदेश पाठविणारे तसेच पॉर्नग्राफी व्हिडीओ शेअर करणाऱ्यांची माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर सातत्याने दबाव आणत आहे. पण व्हॉट्सअॅपने यावर अशी महिती दिल्याने एखाद्या व्यक्तीच्या खाजगीपणाला तडा जाईल असा प्रतिवाद केला आहे.

पण व्हॉट्सअ‍ॅप या दडपणामुळे भारतात शट डाऊन करण्याची तुर्तास तरी शक्यता नाही. यापार्श्वभूमीवर कंपनीचे प्रवक्ते कार्ल वुग म्हणाले की, संदेश कोणी व कोणाला पाठवला त्या व्यक्तीची माहिती आम्ही देऊ शकत नाही. पण त्यामुळे त्या व्यक्तीच्या खाजगीपणाला तडा जाईल. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपने चाईल्ड पॉर्नग्राफी संबंधित संदेशांवर बंदी आणली असून त्यासंबंधित जवळपास दोन लाखाहून अधिक अकाउंट बंद करण्यात आली आहे.

Leave a Comment