मागील पाचवर्षात देशावर झालेले सर्वात मोठे दहशतवादी हल्ले

attack
नवी दिल्ली : काल आपल्या देशावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला. यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत तर 40 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या अनेक बसेस हल्ल्या दरम्यान होत्या. त्यात 2500 पेक्षा जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या गोरीपोरा भागात सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. सीआरपीएफच्या दोन बसला दहशतवाद्यांनी आपले लक्ष केले.

जम्मू-काश्मीर तसेच श्रीनगर येथे वारंवार दहशतवाद्यांना भारतीय लष्कराचे जवान सडेतोड उत्तर देत असतात. त्याचबरोबर मागील 4 ते 5 वर्षात देशातील गुरुदासपुर आणि उरी सारख्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड केले होते. दहशतवाद्यांची खोड मोडण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक देखील केला होता. पण त्यातून या दहशतवाद्यांनी काहीही धडा घेतलेला नाही असेच दिसत असताना काल पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.
attack1
जुलै 2015 साल दहशतवाद्यांनी गुरदासपूरमधील एका प्रवासी बसवर हल्ला केला होता. त्यांनी यानंतर दीनानगर पोसीस ठाण्यात घुसून अंधाधुद गोळीबार देखील केला होता. हा हल्ला तीन दहशतवाद्यांनी केला होता आणि सात लोकांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते.
attack2
त्याचप्रमाणे जानेवारी 2016 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी वायू सेनेच्या पठानकोटमधील तळावर हल्ला केला होता. त्यावेळी लष्कराचे 3 जवान शहीद झाले होते. त्याबरोबर यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनीही 4 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. ऑगस्ट 2016 साली आसामच्या कोकराझारमध्ये नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
attack3
भारतीय लष्कराच्या उरीमधील छावण्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे 19 जवान शहीद झाले होते. त्यावेळी देखील लष्कराच्या जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचबरोबर जुलै 2017 मध्ये अमरनाथ यात्रेनंतर यात्रेकरु परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्या बसवर हल्ला केला होता. यात 7 नागरिक मारले गेले होते. पण त्यावेळी बसच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले होते.

Leave a Comment