सॅमसंगने लाँच केला एवढ्या किंमतीचा ‘गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह 2’

samsung
मुंबई : मोबाईल बाजारात सॅमसंगच्या आणखी एका दमदार टॅबची एंट्री झाली असून सॅमसंगने आपला बहुचर्चित ‘गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह 2’ हा नवीन टॅबलेट लाँच केला आहे. मिलिट्री ग्रेड डिझाईनयुक्त या टॅबची भारतातील किंमत 50 हजार 999 रुपये ऐवढी आहे.

हाय टचशिवाय पोगो पिन या टॅबलेटमध्ये देण्यात आली आहे. पोगो पिन हे एक डिव्हाईस असून या डिव्हाईसच्या मदतीने अनेक डिव्हाईस एकाच वेळी जोडले जातात आणि चार्ज केले जातात. तसेच कोणत्याही लॅपटॉपला किंवा किबोर्डला हा डिव्हाईस सहजपणे कनेक्ट करणे शक्य आहे.

याशिवाय 4450 Mhp ची रिप्लेसेबल बॅटरी, एस-पेन, बायोमॅट्रिक ऑन्थेटिकेशन आणि सॅमसंग सिक्युरिटी प्लॅटफॉर्म नॉक्स देण्यात आल्यामुळे टॅबलेटमधील संवेदनशील माहितीची हॅकर्सपासून सुरक्षा होणार आहे. एमआयएल-एसटीडी-810 जी आणि आईपी 68 सर्टिफिकेट सॅमसंग ‘गॅलेक्सी टॅब अॅक्टिव्ह 2’ला मिळाले आहे. हा टॅब वायब्रेशन, जमिनीवर पडणे, पाऊस, धुळ, उष्ण तापमान यापासून पूर्णपणे सुरक्षित राहील असा दावा करण्यात येत आहे. तसेच अर्धा तास दीड मीटर पाण्यात राहिला तरी या टॅबला काही होणार नसल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे. हा टॅब मार्च महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

Leave a Comment