असा आहे येवले अमृततुल्यचा प्रवास

navnath-yevle
सामान्यत: चहाची विकण्याच्या व्यवसायाला हीन दर्जाच्या कामात गणती केली जाते, पण आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की एक व्यक्ती फक्त चहा विकून दरमहा 12 लाख रुपये कमावते. तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.
navnath-yevle1
येवले अमृततुल्य असे पुण्यातील या चहाच्या दुकानाचे नाव आहे. हे शहरातील काही प्रसिद्ध स्टॉल्सपैकी एक बनले आहे. येवेले अमृततुल्यचे सहसंस्थापक नवनाथ येवले गेल्या वर्षी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की ते लवकरच याचा आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवणार आहेत.
navnath-yevle2
नवनाथ येवले आपल्या टी-हाऊसद्वारे बेरोजगारांच्या हाताला काम देत आहेत. सध्या पुण्यात येवेले अमृततुल्यच्या अनेक शाखा आहेत आणि प्रत्येक शाखेत सुमारे 12 लोक काम करतात. नवनाथ आपल्या व्यवसायातून दर महिन्याला सुमारे 12 लाख रुपये कमावतात.
navnath-yevle2
एका मुलाखतीत नवनाथ यांनी सांगितले की 2011 मध्ये त्यांनी चहाच्या प्रति भारतीयांचे असलेले अविरत प्रेम पाहून चहाला एका उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. ते म्हणतात की येथे खूप चहा प्रेमी आहेत आणि बऱ्याच लोकांना त्यांना जशी हवी तशी चहा मिळत नाही ज्याचे ते पैसे मोजतात. म्हणून आम्ही चार वर्षे चहाचा अभ्यास केला, चहाची गुणवत्ता निश्चित केली आणि मोठ्या ब्रँडद्वारे चहा बनवण्याचा निर्णय घेतला.
navnath-yevle4
नवनाथ म्हणतात की ते एका शाखेत दररोज 3,000 ते 4,000 कप चहा विकतात. त्यांच्या दुकानात नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यांचा देशभरात सुमारे 100 टी स्टॉल उघडण्याचा मानस आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांच्या हाताला काम देऊ शकतील.

Leave a Comment