आयटी इंजिनिअर बनली चक्क अघोरी साधू

aghori
मनुष्याने त्याच्या आयुष्यात कितीही पैसे व प्रसिध्दी मिळविली तरीही आत्मिक शांती समाधानाची सर कशालाच नाही. मोक्ष प्राप्तीच्या शोधात प्रत्येक व्यक्ती असतो. अशा या मोक्ष प्राप्तीच्या नादात कोण काय करेल याचा नेम नाही. याचीच प्रचिती नुकतीच कुंभमेळ्यात आली. एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत आय टी सेक्टर मध्ये रग्गड पैसे कामविणाऱ्या प्रत्यंगिरा या महिलेने चक्क भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्मशानभूमीत साधना करण्यास सुरुवात केली आहे.
aghori1
मोठ्या शहरातील व आय.टी.मध्ये काम करणाऱ्यांप्रमाणे आता त्यांचे राहणीमान राहिले नसून त्या आता कुंभ मेळ्यातील एक सर्वसामान्य साधकाप्रमाणेच राहतात. कपाळावर मोठ्ठ कुंकू, काळे कपडे, गळ्यात रुद्राक्ष माळ हीच आता त्यांची ओळख बनली आहे. जगातील प्रत्येकाच्या सर्व अडचणी दूर व्हाव्या याकरिता त्या देवाधिदेव महादेवाची मनोभावे साधना करतात. रात्री ११ वाजल्यापासून आपण साधना सुरु करत असून पहाटे ३-४ वाजेपर्यंत हि साधना सुरु राहत असल्याचे प्रत्यंगिरा सांगतात. स्मशानभूमीत पूजा अर्चना ती पण एक महिलेची, ऐकायला व वाचायला जरी हे विचित्र वाटत असेल तरी यात तितकीच सत्यता आहे.
aghori2
सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. कुंभमेळ्याची ख्याती केवळ देशापुरतीच मर्यादित नसून सातासमुद्र पलीकडे देखील आहे यात शंकाच नाही. म्हणूनच कुंभच्या प्रत्येक आयोजनात परदेशी नागरिकांची देखील उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येकच वर्षी कुंभमेळ्यात नानाविध साधू-संत आवर्जून भाग घेत असतात. यावर्षी आयोजनात सहभागी झालेल्या व हायटेक पार्श्वभूमी असलेल्या प्रत्यंगिरा नामक महिलेची हि स्मशान भूमीतील साधना आकर्षण व आश्चर्याचा विषय ठरत आहे.

Leave a Comment