आणखी एका स्टार किडची ‘या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री

karan-deol
2018 या साली अनेक स्टार किड्सने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले त्यातील काहींना यश मिळाले तर काहींच्या पदरी अपयश पडले आहे. त्यातच आता आणखी एका स्टार किडची भर पडली आहे. तो स्टार दूसरा तिसरा कोणी नसून सनी देओल याचा मुलगा करण देओल आहे. करण देओल ही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. नुकतेच त्याच्या या चित्रपटाचे पहिली दोन पोस्टर रिलीज करण्यात आले असून ही पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली आहेत. तसेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी खुद्द सनी देओल याने आपल्या खांद्यावर घेतली आहे.


करणसोबत या चित्रपटाद्वारे साहिर बांबा ही नवोदित अभिनेत्री देखील बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे. सनी देओल करणच्या पदार्पणाविषयी बोलताना म्हणाला की माझा मुलगा आपल्या अभिनय आणि प्रतिभेच्या जोरावर प्रेक्षकांवर छाप पाडेल. या क्षेत्रात त्याला त्याचा अभिनयचा टिकवून ठेवेल. हा चित्रपट जुलै महिन्यात रिलीज होणार आहे.