शेतकऱ्याने बनविली एअरबस ३२० ची प्रतिकृती, पर्यटकांची झाली गर्दी

viman
उत्तर पूर्व चीन भागातील काईयुआन गावात सध्या एअरबस ३२० विमानाचे प्रतिकृती पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनली असून ती पाहण्यासाठी रोज प्रचंड गर्दी होत आहे. विशेष म्हणजे शाळा अर्धवट सोडलेल्या आणि लसूण कांद्याची शेती करणाऱ्या झु युवे या शेतकऱ्याने ही प्रतिकृती तयार केली आहे. त्यात त्याला त्याच्या पाच मित्रांनी मदत केली.

सध्या चीन मध्ये नववर्षाच्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे हे विमान पर्यटकांसाठी हॉटस्पॉट बनले आहे. झु युवे याला विमान चालविण्याची हौस होती पण परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते म्हणून त्याने विमान बनविण्याचा निर्णय घेतला. त्याला वेल्डिंग करता येते आणि सायकल दुरुस्ती येते. त्याने आपल्या बचतीतून विमान प्रतिकृती तयार करण्यास सुरवात केली. खूप चुका करता करता, त्याने खेळण्यातील विमान प्रथम तयार केले आणि त्यावरून, तसेच विमानाचे फोटो पाहून त्याने ही प्रतिकृती तयार केली.

farmer
यासाठी त्याने ६० टन स्टीलचा वापर केला आणि ३.५ कोटी खर्च केले. विमान खरे वाटावे म्हणून त्याने त्यात कॉकपिट आणि इंजिन बसविले आहे. हळद, गव्हाच्या शेतात हे विमान उभे आहे.

झु युवे आता या विमानात रेस्टॉरंट सुरु करण्याच्या विचारात आहे. तो म्हणतो माझ्याप्रमाणे अनेकांना पायलट व्हायचे असेल किंवा विमान प्रवास करायचा असेल. पण परिस्थितीमुळे ते अवघड असेल तर हे लोक येथे येऊन त्यांची पदार्थांची भूक तरी भागवू शकतील. आता येथे फक्त चायनिज पदार्थ ठेवायचे का फ्रेंच फ्राईज, बर्गर पण विकायचे याचा विचार सुरु आहे असे तो म्हणतो.

Leave a Comment