तृतीयपंथी का वाजवितात टाळी?

kinnar
सर्वच लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने टाळ्या वाजवितात. आनंदाच्या प्रसंगी, बक्षीस घेतल्यावर, भाषण संपल्यावर, एकाद्या विनोदी कार्यक्रमात कधी होश मध्ये तर कधी जोश मध्ये लोक टाळ्या वाजवितात. मात्र तृतीयपंथी लोक किंवा किन्नर टाळ्या वाजवितात त्यामागे काही खास हेतू असतो. त्यांच्यासाठी टाळी हे जीवन आहे असे म्हटले तरी गैर ठरू नये.

किन्नर समुदायाचा अभ्यास करणारे लोक सांगतात, किन्नर लोक ज्या पद्धतीने टाळी वाजवितात त्या प्रकारे सामान्य माणूस वाजवत नाही. त्यांची टाळी खास प्रकारे वाजविली जाते. या एका टाळीत अनेक अर्थ लपलेले असतात. समुदायात आपले लोक कोण हे ओळखण्यासाठी किंवा त्यांना आम्हीही आहोत याचा संदेश देण्यासाठी किन्नर टाळ्या वाजवितात. आपण पाहतो कि बरेच तृतीयपंथी साड्या नेसतात किंवा पंजाबी सुट घालतात. मात्र काही किन्नर ओळख पटू नये म्हणून शर्टँपँट वापरतात. त्याना गर्दीतही टाळ्या वाजवून संदेश दिला जातो.

किन्नर काही खास वेळीच नाही तर सुखात, दुःखात, भांडण, झगडा झाल्यासही टाळ्या वाजवितात. काही वेळा लोकांकडे बघून ते टाळ्या वाजवितात. अश्यावेळी संबंधित माणसाचे काही वाईट होणार असा अर्थ त्यातून काढला जातो मात्र ते खरे नाही. एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठीही किन्नर टाळ्या वाजवितात.

Leave a Comment