टीव्हीएसने आणली सिटी प्लस कारगिल एडिशन

kargil
बर्फाळ प्रदेश आणि कारगिलसारख्या दुर्गम भागात देशवासीयांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस जागृत असलेल्या भारतीय सैनिकांच्या दृढ निश्चय आणि अनुशासनावरून प्रेरणा घेऊन बनविलेली सिटी प्लस कारगिल एडिशन स्पेशल बाईक टीव्हीएसने लाँच केली आहे. स्टार सिटी प्लसच्या सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजीवर आधारित ही बाईक भारतीय सेनेच्या भावनांना समर्पित केली गेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक भारतीयाची सैनिकांबद्दल असलेली भावना यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या बाईकला व्हाईट ग्रीन ड्युअल कलर तों फिनिश दिले गेले असून त्यामुळे या बाईकचा लुक युनिक आहे. ही लिमिटेड एडिशन बाईक एक्स शो रूम ५४३९९ रुपयात मिळणार असून त्याचे बुकिंग सुरु झाले आहे. आर्मी युनिफॉर्म प्रमाणे बाईकचे ग्राफिक केले गेले आहे. बाईकचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत साईटवर करता येणार आहे. कॉस्मेटिक अपडेटशिवाय बाईकमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल केला गेलेला नाही. या बाईकला ११० सीसी सिंगल सिलिंडर इंजिन ४ स्पीड ट्रान्समिशन सह दिले गेले असून ही बाईक लिटरला ८६ किमी मायलेज देते असा दावा कंपनीकडून केला गेला आहे.

Leave a Comment