हे आहे जगातील सर्वाधिक ढब्बू जोडपे

leerena
स्थूलता ही माणसासाठी आजारापेक्षाही भयाण व्याधी ठरू शकते याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या मिसुरी येथे राहणारे ४२ वर्षीय ली आणि ३९ वर्षीय रेना हे जोडपे. हे जोडपे जगातील सर्वाधिक वजनदार जोडपे असून या दोघांचे मिळून वजन एका मिनी कार इतके म्हणजे ६०० किलोच्या आसपास आहे.

हे जोडपे त्याच्या या ढब्बूपणाचे अनेक त्रास सोसत असले तरी त्यांची प्रेमकहाणी मात्र मनोरंजक आहे. १० वर्षापूर्वी ली आणि रेना वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होते आणि अश्याच एका वेटलॉस क्लिनिक मध्ये त्यांची ओळख झाली. बघता बघता प्रेम जमले आणि या दोघांनी वेटलॉस कार्यक्रम मध्येच सोडून दिला. त्याचा दुष्परिणाम असा झाला कि दोघांचेही वजन झपाट्याने वाढले.

obese
लीचे वजन ३२४ किलो आहे तर रेनाचे २४६ किलो. ली सहज चालू शकत नाही त्यामुळे तो बराच काळ बेडवर असतो. त्याची सर्व काळजी त्याची बहिण केसी घेते. एका इंग्रजी चॅनल वर ली आणि रेना यांनी त्यांना कसे खडतर आयुष्य जगावे लागते आहे त्याची कहाणी सांगितली. आम्ही स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकत नाही याची खंत त्यांनी बोलून दाखविली.

Leave a Comment