एवढ्या लोकांनी घेतला आहे ट्रायच्या नव्या नियमावलीचा लाभ

trai
1 फेब्रुवारीपासून आपल्या आवडीच्या चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य ट्रायने दिले आहे. ट्रायच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना फक्त त्यांच्या आवडीचे चॅनलासाठीच पैसे भरावे लागणार आहेत. पण नुकतीच या नियमाला 31 मार्चपर्यंत मुदत वाढ दिली आहे.

या नव्या योजनेतंर्गत आत्तापर्यंत 170 मिलियन ग्राहकांपैकी 90 मिलियन ग्राहकांनी ही सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील त्यामध्ये 60 मिलियन ग्राहक हे केबलधारक तर 25 मिलियन ग्राहक हे डीटीएच धारक असल्याची माहिती ट्रायने दिली आहे.

अनेक केबल ऑपरेटर्सकडून ट्रायच्या नव्या नियमांना बगल देत ग्राहकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार देखील पुढे येत आहेत. काही ग्राहकांनी तर केबल चालक या नव्या नियमांना लागू करत नाहीत अशी तक्रार केली आहे.

क्रिसिल या संस्थेने आपल्या अहवालामध्ये ग्राहकांना ट्रायच्या नव्या नियमानुसार 25 टक्के भूर्दंड बसल्याचे म्हटले आहे. पूर्वी 230-240 रूपयांचा पॅक आता 300 रूपयाला पडत असल्याचे क्रिसिलचे म्हणणे आहे.

Leave a Comment