विज्ञानाचा चमत्कार: आता मानवाच्या शरीरात होऊ शकते प्राण्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण

animal
याला तुम्ही विज्ञानाचा चमत्कार म्हणा अथवा मानवाचे सामर्थ्य. पण हे खरे आहे की तो दिवस दुर नाही की मानवाच्या शरीरात जनावरांचे अवयव प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. म्हणजेच लोकांना आता एखादा अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी अवयव दान करणाऱ्यांची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
animal1
जगभरात सध्याच्या घडीला अवयव दान करण्यावरुन वादविवाद सुरु होता की शास्त्रज्ञांनी एक असा अविष्कार केला आहे ज्यामुळे अवयव प्रत्यारोपणाची समस्या सोडवली जाऊ शकते. वैद्यकीय क्षेत्रात वैज्ञानिकांनी वेगवान क्रांतिकारक पाऊल उचलली आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंभीर आजाराने पीडित लोकांच्या शरीरामध्ये डुक्कराच्या हृदयाचे प्रत्यारोपण करण्याची शक्यता जास्त वाढली आहे.
animal2
जर्मन शास्त्रज्ञांनी संपूर्ण वैद्यकीय आणि विज्ञान जगाला त्याच्या नवीन प्रयोगाने पूर्णपणे धक्का दिला आहे. बैबूनच्या (माकडाची एक प्रजाती) शरीरात डुक्करच्या हृदयाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात यश मिळविले आहे. डुक्कराचे हृदय मिळवल्यानंतर हे बाळ 6 महिन्यांहून अधिक काळ जगले.
animal3
शास्त्रज्ञांनी या शोधाला मैलाचा दगड म्हटले आहे. एक प्राण्याच्या शरीरात दुसऱ्या प्रजातीतील प्राण्याचे हृदय प्रत्यारोपित करण्याच्या प्रक्रियेला ‘ecnantransplantation’ म्हणतात. निसर्ग जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामुळे असे मानले जात आहे कि भविष्यात मानवजातीसाठी ही प्रक्रिया नवसंजीवनी ठरु शकते. प्रत्यारोपणासाठी डुक्करांच्या जनुकमध्ये बदल केले गेले ज्यामुळे दुसऱ्या प्रजातींच्या प्रतिरक्षा प्रतिसादावरील दुसरी प्रतिक्रिया दडपली जाऊ शकेल.
animal4
जर्मन हार्ट सेंटर बर्लिनचे डॉक्टर क्रिस्टोफ नोसाला म्हणतात की 2030 पर्यंत अमेरिकेत हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांची संख्या 80 दशलक्षांवर पोचू शकते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जनुकांमध्ये (जीन) बदल करणार डुक्करामुळे याचे समाधान होऊ शकते. तथापि, अशा संशोधनापूर्वीच वैज्ञानिकांना मर्यादित यश मिळाले होते. म्यूनिखमध्ये, लुडविग मॅक्समिलियन विद्यापीठातील संशोधक बैबुनला 57 दिवस जिवंत ठेवू शकले.
animal5
संशोधकांनी हे तीन वेगवेगळ्या गटांवर हा प्रयोग केला आहे. पुर्ण अभ्यासा दरम्यान 16 बैबुन माकडांचा समावेश केला गेला होता आणि त्याच्या अंतिम चरणात त्यांना यश मिळाले होते. हृदयरोग तज्ञ प्राध्यापक मॅकग्रेगॉर म्हणतात की हा अभ्यास फार महत्वाचा आहे. हे आपल्याला हृदयरोगाच्या समस्येचा अंत करण्याचा मार्ग दाखवते.
animal6
संशोधकांनी हृदयाला ऑक्सिजन पोहोचवून ही दीर्घ प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासाठी त्यांनी संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण केले. या कारणास्तव, बैबुन रक्तदाब कमी असूनही, प्रत्यारोपित अवयवाचा आकार वाढला नाही. शेवटच्या गटातील पाचपैकी चार बैबुन 90 दिवस निरोगी होते, तर एक 195 दिवसांपर्यंत जीवंत होता.

Leave a Comment