या व्यक्तीला चक्क सरकारने दिली आहे मानवी अंगाचे लोणचे विकण्याची परवानगी

britain
आजवर आपण अनेक प्रकारचे लोणचे बघितले किंवा चाखले देखील असेल पण लंडनमधील एक्सेस येथील एका भयावह आणि विचित्र दुकानात जाताना लोकांचा थरकाप उडता आहे. या दुकानातील अगरबत्ती आणि धुपाचा वास तुम्हाला वेगळ्या जगाची प्रचिती घडवून आणते. अगरबत्ती आणि धुपाच्या धुरात तुम्हाला विविध प्रकारच्या काचेच्या बरण्यांमध्ये चक्क मानवी अंग असल्याचे दिसून येते. या दुकानाच्या दुकानदाराने या बरण्यांमध्ये मानवी शरीराचे विविध अंगाचे लोणचे बनवून संग्रही ठेवले आहे. त्यात आश्चर्य म्हणजे या दुकानदाराने हे लोणचे लोकांना दाखविण्यासाठी तर विकण्यासाठी ठेवल्या आहेत आणि त्यासाठी एक विशेष किंमत देखील ठेवली आहे.
britain1
क्यूरिॉसिटीज फ्रॉम द फिफ्थ कॉर्नर (Curiosities from the 5th Corner) असे एसेक्समधील या दुकानाचे नाव आहे. मानवी शरीराच्या अंगांसह विविध प्रकारच्या जनावरांचे अंग सुद्धा दुकानाचा मालक हेनरी स्क्रॅग यामध्ये ठेवत असतो. 900 रुपयांपासून 2.5 लाख रुपयांपर्यंत या सर्वच विचित्र गोष्टींची किंमत आहे. आपल्या दुकानात हेनरीने महिलांचे अंग सुद्धा साठवून ठेवले आहेत. गर्भ, ओव्हरी आणि इतर गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. एका कर्करोगग्रस्त व्यक्तीचा निकामी हात सुद्धा हेनरीने आपल्या दुकानात संग्रहित करून विक्रीसाठी ठेवला आहे. त्याचबरोबर यामध्ये एका मृत अर्भकाला सुद्धा बरणी ठेवण्यात आले आहे.
britain2
या दुकानामागील आपली कल्पना हेनरीने सांगितली असून तो म्हणतो माझ्या कामाची पद्धत आणि संकल्पना काही लोकांना भयभीत करणारी किंवा चुकीची वाटू शकते. पण आपण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कधी पाहिलेल्या नाहीत असे मला वाटते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे दहन किंवा दफन केले जाते. मानवी शरीराचे अंग जवळून कसे दिसतात हे आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळतील असे हे दुकान आहे. केवळ पाहणेच नव्हे, तर लोकांना आवडल्यास ते खरेदी सुद्धा करू शकतात.
britain3
अशा प्रकारचे दुकान सुरू ब्रिटनमध्ये असून त्यावर कोणाही आक्षेप कसा घेतला नाही असा प्रश्न अनेकांना पडला असावा. पण वैद्यकीय मंडळाच्या परवानगीनंतरच हेनरीने हे दुकान उघडले आहे. यात ठेवलेल अनेक मानवी अंग तर विविध रुग्णालयांनी दान केलेल्या मृतदेहांतून काढण्यात आले आहेत. फॉर्मलडिहाइडमध्ये त्यातून काढलेले अंग बु़डवले जातात. जेणेकरून मानवी अंगाचे टिशू खराब होण्याची प्रक्रिया बंद होते. यानंतर तो हे अंग अल्कोहोलमध्ये बुडवतो. तरीही अंगांना नेहमीच सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी लिक्विड बदलावे लागते असे हेनरीने सांगितले आहे.

Leave a Comment