सर्वकालीन सौंदर्यवतीला गुगलची आदरांजली

google
मनातील भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. आपल्या प्रिय व्यक्तिला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करण्याचा दिवस…फुले देऊन कुणी पार्टनरला प्रपोज करतो… तर कुणी गिफ्ट देऊन…. कुणी मनातील भावना कागदावर लिहून प्रपोज करतात. असा व्हॅलेंटाईन डे आज जगभरात साजरा केला जात आहे. पण आजचा दिवस हा गुगलने सर्वकालीन सौंदर्यवती असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री मधुबाला यांच्या 86 व्या जयंतीनिमित्ताने गुगलने आजचे आपले डूडल मधुबाला यांना समर्पित केले आहे. मधुबाला यांचे एक सुंदर चित्र गुगलच्या डूडलवर रेखाटण्यात आले आहे. हे रेखाचित्र मधुबाला यांच्या सौंदर्याप्रमाणे अतिसुंदर आहे.

दिल्ली येथे 14 फेब्रुवारी 1933 साली मधुबाला यांचा जन्म झाला. मुमताज जहां देहलवी असे त्यांचे त्यांचे बालपणीचे नाव होते. अताउल्लाह आणि आयशा बेगम असे त्यांच्या वडिलांचे आणि आईचे नाव होते. पेशावर येथील तबांखूच्या कारखान्यात त्यांचे वडील काम करायचे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि तेथून मुंबईत दाखल झाले.

आजही अनेकांच्या मनावर अभिनेत्री म्हणून मधुबाला राज्य करतात. त्यांच्या सौंदर्याची गाथा आजही सांगितली जाते. त्यांची सौंदर्य म्हणजे सुंदरतेचे दुसरे नावच अशी ओळख होती. मधुबाला यांचा जन्म व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाला आणि त्यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून लोकांना आपल्या प्रेमात पाडले, प्रेम करायला शिकवले.

त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांबाबत खुप आस होती. त्यांना नेहमी असे वाटायचे की आपण देखील चित्रपटात काम करायचे होते. त्या आपले स्वप्न पूर्ण करत चित्रपटात आल्या आणि भारतीय सिनेसृष्टीचे एक नवे पर्व सुरु झाले. 1942 साली आलेल्या ‘बसंत’ या चित्रपटाद्वारे मधुबाला यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर मधुबाला यांची सुंदरता प्रेक्षकांच्या मनात भरली. 70 हून अधिक चित्रपटांमध्ये मधुबाला यांनी अभिनय केला अणि या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लाखो मनांवर राज्य करणाऱ्या या सर्वकालीन सौंदर्यवतीने 23 फेब्रुवारी 1969 साली जगाचा निरोप घेतला.

Leave a Comment