तिहार कारागृहातील बरॅक नं 3 मध्ये अफजल गुरुच्या आत्म्याचा वास!

tihar
देशातील सर्वात मोठा तुरुंग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या तिहार कारागृहात खतरनाक कैद्यांना ठेवले जाते. तिहार कॅम्पसमध्ये 10 तुरुंग आहेत, ज्यातील बरॅक नं 3 ची गणती सर्वात खतरनाक म्हणून केली जाते. येथे कोणताही कैदी राहू इच्छित नाही.
tihar2
खर तर, येथील कैद्यांना असे वाटते की भारतीय संसद भवनावर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुची आत्मा येथे फिरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील काही कैदी अभास असल्याचे मानत दुसऱ्या कैद्यांचे मनोबल वाढवत आहेत. पण त्यांचे काय ज्यांना रात्री स्वप्नात अफजल गुरु दिसतो. दरम्यान येथील काही कैदी भूतबाधा दूर करण्यासाठी येथे पूजा पाठ देखील करतात. एवढे करुन सुद्धा त्यांना येथे भुत दिसत असल्याची तक्रार ते करत आहेत.
tihar3
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बरॅक क्रमांक 3 मध्ये असलेल्या कैदी रात्री झोपताना मनातल्या मनात हनुमान चालीस किंवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करत असतात. दरम्यान जेलमध्ये कडेकोट बंदोबस्तात 9 फेब्रुवारी 2013 साली तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यापूर्वी 8 फेब्रुवारीच्या रात्री पर्यंत जेलमधील इतर कैद्यांना माहित नव्हते की दुसऱ्या दिवशी अफजल गुरुला फाशी देण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आली. त्यानंतर दुपारी तिहारमधील कैद्यांना याची माहिती देण्यात आली.
tihar1
अफजल गुरूचा आत्मा तिहारच्या बरॅक क्रमांक 3 मध्ये भटकत आहे का? का इतर कैद्यांना हा भास, अंधश्रद्धा आणि भूताची भीति अथवा गेल्या काही दिवसांपासून हे कैदी व्यवस्थित झोपले नसल्यामुळे त्यांना असे वाटत आहे. जेव्हा त्यांचे लक्ष त्या अंधाऱ्या कोठडीकडे जाते तेव्हा त्यांच्या मनात भीती वातावरण तयार होते.
tihar4
असे देखील म्हटले जाते की येथील कैद्यांना बरॅक क्रमांक तीन मधून कधी ओरडण्याचा आवाज देखील ऐकू येतो तर काहीवेळा ते इतर मार्गांनी घाबरतात. असे म्हटले जात आहे की काही काळापूर्वी भूताने कैद्यांना मारले. जेलमध्ये भटकत असलेल्या आत्म्यासाठी देखील पूजा-अर्चा देखील केली जाते. पण असे असूनही, अनेक कैदींनी अशी तक्रार केली आहे की त्यांनी भूत पाहिले आहे.
tihar5
जेलमधील काही अधिकाऱ्यांना देखील असे वाटते की जेलमध्ये भुताचा वास आहे. या अधिकाऱ्यांचे असे देखील म्हणने आहे की या जेलमध्ये असे देखील काही कैदी होते जे आपल्या वाईट नशीबामुळे येथे आले आणि त्यांनी येथील बाहुबली आरोपींच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनलीला संपवली. त्यांचेच आत्मे या जेलमध्ये भटकत आहेत. दरम्यान तिहार कॅम्पसमध्ये 10 जेल आहेत. पण यातील बरॅक क्रमांक तीनमध्येच फाशी देण्याची व्यवस्था आहे. याच ठिकाणी खतरनाक दहशतवाद्यांना ठेवले जाते आणि बरॅकमधूनच भुत असल्याच्या तक्रारी सर्वात जास्त येत असतात, असे येथील अधिकारी सांगतात.

Leave a Comment