अंतराळात ही कामे करु शकत नाही मनुष्य? जाणून घेतल्यावर तुम्हालाही वाटेल आश्चर्य

fact
आपल्या सगळ्यांच्या मनात अंतराळाविषयी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. प्राचीन काळामध्येही अंतराळाशी निगडीत अनेक रहस्यांचा शोध लावले गेले आहेत. पण त्यानंतर अंतराळात जाणे संभव नव्हते. हे संभव झाले ते 12 एप्रिल 1961 साली. सोव्हिएत संघाचे युरी गॅग्रिन यांनी व्होस्टोक -1 मध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि ते सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आले होते. अंतराळात जाणारे ते पहिले व्यक्ती होते.
fact1
तथापि, मनुष्याला अंतराळामध्ये पाठविण्याआधी, लाईका नावाच्या कुत्र्याला अंतराळात पाठविण्यात आले होते. त्याने 13 नोव्हेंबर 1957 रोजी स्पुतनिक सेकंड या यानात बसून पृथ्वीची प्रदक्षिणा घातली. पण तो पृथ्वीवर जीवंत येऊ शकला नाही.
fact2
फेब्रुवारी 1984मध्ये अमेरिकेचे अंतराळवीर ब्रुस मॅककंडल्स हे यानातून निघुन अंतराळात भ्रमण करणारे पहिले व्यक्ती ठरले. ते चैलेंजर नावाच्या अंतरिक्षयानच्या बाहेर येऊन 300 फुटांपर्यंत त्यांनी भ्रमंती केली होती.
fact3
अंतराळात जाणारे जेन डेव्हिस आणि मार्क ली हे पहिले जोडपे होते. त्यांचा 1992साली शटल इंडीवरच्या चालक दलात त्यांचा समावेश होता.
रशियाचे अंतराळवीर व्लादिमिर कोमोरोव्हने अंतरिक्ष प्रवासादरम्यान मरण पावणारी पहिले व्यक्ती होते. 23 एप्रिल 1967 ते आपल्या दुसऱ्यांदा करत असलेल्या अंतराळ यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
fact4
व्हॅलेंटाइना टेरेस्कोवा या अंतराळ यात्रा करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. 16 जून 1963 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनचे व्हॅलेंटाइना यांना व्होस्टोक 6 यानाच्या माध्यमातून पायलट म्हणून अंतराळात जाणारी पहिली महिला म्हणून त्यांचा गौरव झाला होता.
fact5
अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन हे जगातील सर्वात वयोवृद्ध अंतराळवीर होते. 1996 मध्ये 77 वर्षांच्या वयात त्यांनी स्पेस शटल डिस्कवरीमधून अंतराळाला भेट दिल्यामुळे सर्वात वयोवृद्ध अंतराळवीर होण्याचा विक्रम त्यांनी बनवला होता.
fact6
जर एखाद्या व्यक्तीस विना सुरक्षा यंत्राच्या मदतीने अंतराळात सोडले तर तो दोन मिनिटांपर्यंतच जगू शकतो. त्यामागे असे कारण आहे की, अंतराळात हवेचा दबाव नसतो, त्यामुळे कोणत्याही सुरक्षा उपकरणाविना कोणतीही व्यक्ती अंतराळात गेल्यास त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊ शकतात.
fact7
जर कोणी व्यक्ती अंतराळात जोर जोरात ओरडला तर त्याच्या अवतीभवती असलेले लोक त्याचे ओरडणे ऐकू शकणार नाही, कारण तिथे आपला आवाजाला एका स्थानाहून दुसऱ्या स्थानपर्यंत जाण्यासाठी कोणतेही माध्यम उपलब्ध नाही.
fact9
अंतराळात समजा कोणा अंतराळावीराला रडावेसे वाटले तर तो येथे रडू शकता नाही, कारण तिथे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे त्याचे अश्रु खाली पडू शकत नाहीत. त्यातबरोबर अंतराळातील जेवणावर मीठ अथवा मिरची पावडर टाकू शकत नाही. त्यामुळे तेथील व्यक्तींना द्रवपदार्थ भोजन म्हणून घ्यावे लागते. तेथे गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे कोरडे पदार्थ हवेत तरंगतात आणि आपआपसात त्यांची टक्कर होण्यासोबतच ते अंतराळवीराच्या डोळ्याला इजा देखील पोहचवू शकतात.
fact10
अंतराळ यानातील अंतराळवीरांना तेथे झोपणे देखील कठिण असते. त्यांना झोपण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. त्यांना डोळ्यापट्टी बांधून एका बंकरमध्ये झोपावे लागते, नाहीतर गुरुत्वाकर्षणामुळे तरंगत असताना त्यांची टक्कर होण्यापासून सुटका होईल.

Leave a Comment