रुडॉल्फ इनग्राम, ७ वर्षाचा स्पीडस्टार

rudolf
वेगवान धावपटू आणि उसेन बोल्ट हे समीकरण सगळ्या जगात रुजले असतानाचा अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील बे ऑफ टेम्पा मध्ये उदयाला आला आहे. वयाच्या सातव्या वर्षीच उसेनच्या रेकॉर्डच्या जवळ पोहोचलेल्या रुडोल्फ इनग्राम याला म्हणूनच स्पीडस्टार आणि ब्लेझ अशी सार्थ टोपणनावे मिळाली आहेत.

विजेच्या वेगाने धाव घेणाऱ्या रुडॉल्फने १०० मीटरची रेस १३.४८ सेकंदात जिंकली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हेच अंतर तोडण्यासाठी त्याने १४.५९ सेकंद घेतली होती. त्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. आत्ताच त्याचे ३ लाख फॉलोअर्स आहेत. रुडॉल्फने ६० मीटरची रेस ८.६९ सेकंदात जिंकली. त्याचे वडील रुडॉल्फ सिनिअर फुटबॉल कोच आहेत. उसेन बोल्टने २००९ मध्ये बर्लिन वर्ल्ड चँपियनशिप मध्ये १०० मीटरची रेस ९.५८ सेकंदात जिंकून वर्ल्ड रेकोर्ड केले आहे.

रुडॉल्फने १०० मीटर रेस १३.४८ सेकंदात जिंकली असली तरी ते वर्ल्ड रेकॉर्ड नाही. त्याच्या वयोगटात अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स याने २०११ मध्ये हेच अंतर १३.४६ सेकंदात तोडले होते. याचा अर्थ रुडोल्फ वर्ल्ड रेकॉर्डपासून केवळ २ सेकंद दूर आहे.

Leave a Comment