बुलेटपेक्षाही पॉवरफुल व्हेस्पा जीटीएस ३०० सादर

vespa-gts
पिअजिओने आत्तापर्यंतची सर्वात पॉवरफुल व्हेस्पा २०१९ व्हेस्पा जीटीएस ३०० लाँच केली आहे. गेल्या वर्षी इआयसीएमए मोटार सायकल शो मध्ये ही गाडी सादर केली गेली होती. सध्या ही गाडी फक्त युरोपच्या बाजारपेठेत उपलब्ध असून भारतात ती कधी येणार याची माहिती दिली गेलेली नाही. मात्र भारतात या गाडीची किंमत ४ ते ५ लाखाच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे.

या स्कूटरला २७८ सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन दिले गेले असून ही स्कूटर रॉयल एन्फिल्ड बुलेटपेक्षा पॉवरफुल असल्याचा दावा केला जात आहे. या स्कूटरचे मायलेज चांगले आहे. स्टँडर्ड ट्रॅक्शन कंट्रोल, नवे एलइडी हेडलाईट, नवीन सीट डिझाईन, २ हेल्मेट मावू शकतील अशी डिकी, युएसबी चार्जिंग पोर्ट, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हिटी अशी तिची अन्य फिचर आहेत. बाईक फाइंडर अॅपच्या मदतीने ही स्कूटर गर्दीच्या पार्किंग मधून सहज शोधता येते.

Leave a Comment