गौतम गंभीरचे पहिले प्रेम भारतीय लष्कर

gautam
दोन विश्वकप जिंकण्यात महत्वाचे योगदान दिलेला टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर याने त्याचे पहिले प्रेम भारतीय सेना हे होते आणि ते न मिळाल्याची खंत आयुष्यभर राहील अशी मन कि बात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना बुधवारी व्यक्त केली. तो म्हणाला १२ वी झाल्यानंतर मी रणजी सामना खेळलो नसतो तर नक्कीच एनडीए मध्ये गेलो असतो. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. अर्थात भारतीय सेनेबद्दलचे प्रेम आजही कायम आहे आणि त्यातूनच शहीद जवानांच्या मुलांच्या मदतीसाठी फाउंडेशन स्थापन केल्याचे त्याने सांगितले.

गौतम म्हणाला भारतीय सेनेसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे हीच भावना आजही आहे. आज आमच्या फौंडेशनच्या माध्यमातून शहीद जवानांच्या ५० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या मदतीचा विस्तार करून आता १०० मुलांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. यातून सेनेबद्दलचे प्रेम जिवंत ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे.

गौतमने २०१८ च्या अखेरी शेवटचा रणजी सामना खेळून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताने २००७ साली जिंकलेल्या टी २० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप मध्ये गौतम दोन्ही वेळा टॉप स्कोअरर होता.

Leave a Comment