सौदी प्रिन्सच्या आगमनासाठी पाकची जोरदार तयारी

prince
सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान दोन दिवसांच्या पाकिस्तान भेटीसाठी १६ फेब्रुवारीला इस्लामाबाद येथे येत असून त्याच्या स्वागताची आणि सुरक्षेची जोरदार तयारी सुरु आहे. प्रिन्सच्या आगमनापूर्वीच सौदीचे १२३ रॉयल गार्ड पाकिस्तानात हजर झाले आहेत. पंतप्रधान इम्रानखान याच्या निवासस्थानी प्रिन्स मुक्काम करतील असे समजते. त्यामुळे तेथे सुरक्षा व्यवस्था वाढविली गेली असून प्रिन्सच्या सकाळच्या व्यायामासाठी खास जिम तयार केली गेली आहे.

प्रिन्सच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी रॉयल गार्ड सांभाळणार असून त्यांना पाक सेना मदत करणार आहे. प्रिन्सचा ३०० लँड क्रुझरचा ताफा रस्त्यावरून जाताना हे मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी बंद ठेवले जाणार आहेत. पंतप्रधान निवासस्थाना बरोबर अन्य ८ खासगी हॉटेलमध्येही सुरक्षा कडक केली गेली आहे. प्रिन्स बरोबर रॉयल फॅमिलीतील सदस्य, पत्रकार, डॉक्टर्स येणार आहेत. या भेटीत सौदी आणि पाकिस्तान मध्ये १४ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे करार केले जाणार असल्याचे समजते.