भाई सलमानचा व्हेलेंटाईन डे कतरिना सोबत

bharat
आज १४ फेब्रुवारी. जगभर प्रेमाचा इजहार करण्यासाठी हा दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा होत आहे. सर्वसामान्य प्रेमींप्रमाणे बॉलीवूड तारे तारका आणि जोडपी हा दिवस साजरा करण्यापासून स्वतःला दूर ठेऊ शकत नाहीत. बॉलीवूडचा भाई सलमान खान हाही आजच्या दिवशी एकटा राहणार नाही तर जुनी मैत्रीण कतरिना कैफ सोबत तो हा दिवस घालविणार आहे. थांबा! कोणताही वेगळा अर्थ काढू नका कारण सलमान हा दिवस त्याच्या भारतच्या शुटींगमध्ये व्यस्त असणार आहे आणि या शुटींग मध्ये कतरिनाचाही सहभाग आहे.

आजच्या दिवशी सलमान आणि कतरिना त्याच्यातील एक सीन शूट होत आहे. त्यात जॅकी, तब्बू, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पाटणी हेही सहभागी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि कतरिना याच्यावर एक वेडिंग सॉंग नुकतेच चित्रित झाले आहे. सलमान आणि कतरिना अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये होते आणि काही कारणाने ते दूर झाले होते. तरी त्यांची दोस्ती कायम आहे. अनेक कार्यक्रमात ते एकत्र दिसतात त्यावरून ते पुन्हा जवळ आल्याचे तर्क केले जात आहेत.

सलमानच्या आगामी भारत मध्ये कतरिना त्याची प्रेमिका आहे तर दिशा पाटणी त्याच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा टीझर पूर्वीच रिलीज झाला आहे.

Leave a Comment