व्हॉट्सअ‍ॅप बंदीचे पहिले बळी ठरले ‘हे’ खासदार

MP-Rames
व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि फेक न्यूजमुळे देशात मॉब लिचिंग सारख्या घटनांमुळे कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर युजर्संना सुरक्षितरित्या करता यावा, यासाठी कंपनीने आपल्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा देखील उगारला आहे. त्यानुसार आता व्हॉट्सअ‍ॅपने टीडीपी खासदार सीएम रमेश यांच्यावर नुकतीच बंदी घातली आहे. पण, सीएम रमेश यांनी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासंबंधीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे सांगत त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तसेच, फेसबुकने देखील कारवाईसंदर्भात कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तुम्ही जर अशी चुक केली तर डिलीट होईल तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट
व्हॉट्सअॅप फेक न्यूजचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी दर महिन्याला 20 लाख अकाउंट डिलीट करत असून यात मोठ्या प्रमाणावर मेसेज (बल्क मेसेज) पाठवणाऱ्यांच्या अकाउंटचा समावेश आहे. व्हॉट्सअॅप बल्क मेसेज पाठवणाऱ्या युजर्सचा शोध घेण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करत आहे. याबाबत फोर्ब्सच्या बातमीनुसार व्हॉट्सअॅपने संदिग्ध मेसेज पाठवणाऱ्या अकाउंटमधील 95 टक्के युजर्सची अकाउंट डिलीट केली आहेत.

इतर मेसेजिंग अॅपप्रमाणेच व्हॉट्सअॅपचाही दुरुपयोग केला जात आहे. इतरांची खाजगी माहिती जमा करण्याच्या उद्देशाने काही लोक लिंक पाठवतात. कंपनीच्या अटी आणि नियमात अॅटोमॅटीक आणि बल्क मेसेज पाठवणे बसत नाही. व्हॉट्सअॅपने या गोष्टी रोखण्यासाठी अशी अकाउंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअॅपचा वापर जर तुम्ही करत असाल तर सावध व्हा. तुमची एक लहानशी चूक तुमचे अकाउंट डिलीट करण्यास कारणीभूत ठरू शकते. तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट व्हॉट्सअॅपच्या अटी आणि नियमांनुसार अश्लील, त्रास देणारे, भावना भडकावणारे मेसेज पाठवणे, बनावट खाते तयार करणे, बल्क मेसेज पाठवणे यामुळे डिलीट होऊ शकते.

Leave a Comment